E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Samruddhi Dhayagude
14 May 2025
अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद आणि हरिहर मंदिर वाद प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी आपला निर्णय राखून ठेवला आहे. मशीद समितीचे वकील, मंदिराच्या बाजूने हरिशंकर जैन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे वकील यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी आपला निर्णय राखून ठेवला.
यापूर्वी, ५ मे रोजी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या वकिलांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यावर न्यायालयाने मशीद समितीच्या वकिलांना ’प्रतिसाद’ दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. यानंतर याची पुढील सुनावणीची तारीख १३ मे निश्चित केली होती.
न्यायालयाने एएसआयला पाहणीचे दिले आदेश
संभल न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केली आहे. संभल न्यायालयाने वकील कमिशनकडून मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी, अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभल जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या मूळ प्रकरणावरील सुनावणी पुढील तारखेपर्यंत स्थगित केली होती. मूळ खटल्यात, हिंदू पक्षाने संभळच्या मोहल्ला कोट पुरबी येथील श्री हरिहर मंदिरात (कथित जामा मशीद) प्रवेश करण्याचा अधिकार मागितला आहे.
या पुनर्विचार याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे, की हा खटला १९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी दाखल करण्यात आला होता, आणि काही तासांतच न्यायाधीशांनी एका अधिवक्ता आयुक्ताची नियुक्ती करून त्यांना मशिदीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.
हरिहर मंदिर पाडून मशीद बांधली
वकील हरिशंकर जैन आणि इतर सात जणांनी संभलच्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला आहे, की कथित शाही ईदगाह मशीद मंदिर पाडून बांधण्यात आली.
Related
Articles
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त
28 May 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
पाकिस्तानच्या ७६ चौक्या उद्ध्वस्त
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात